RSVP

Experience the fusion of imagination and expertise with Études Arch Summit, February 2025.

A ramp along a curved wall in the Kiasma Museu, Helsinki, Finland
.fusion-columns .fusion-column { float: none; width: 100% !important; margin: 0 0 50px; box-sizing: border-box; } .fusion-blog-layout-medium .fusion-meta-info .fusion-alignleft, .fusion-blog-layout-large .fusion-meta-info .fusion-alignleft, .fusion-blog-layout-medium .fusion-meta-info .fusion-alignright, .fusion-blog-layout-large .fusion-meta-info .fusion-alignright { display: block; float: none; margin: 0; width: 100%; } .fusion-blog-layout-medium .fusion-post-slideshow { margin: 0 0 20px 0; height: auto; width: auto; flex: 1 0 100%; } .fusion-blog-layout-medium .fusion-post-content { flex: 0 1 100%; } .fusion-blog-layout-large-alternate .fusion-date-and-formats { margin-bottom: 35px; } .fusion-blog-layout-large-alternate .fusion-post-content { margin: 0; } .fusion-blog-layout-medium-alternate .has-post-thumbnail .fusion-post-slideshow { display: inline-block; margin-right: 0; max-width: 197px; } .fusion-blog-layout-grid .fusion-post-grid { position: static; width: 100%; } .fusion-blog-layout-timeline { padding-top: 0; } .fusion-blog-layout-timeline .fusion-post-timeline { float: none; width: 100%; } .fusion-blog-layout-timeline .fusion-timeline-date { margin-bottom: 0; margin-top: 2px; } .fusion-timeline-icon, .fusion-timeline-line, .fusion-timeline-circle, .fusion-timeline-arrow { display: none; }

.माझी ओळख वंदना ताईंशी रेकीच्या फॉलो-अप क्लासमध्ये झाली.

ओळख म्हणजे, रेकीच्या मॅडमबद्दलचा आणि रेकीचे अनुभव सांगताना मी वंदना दीदीला पाहिले होते.

पहिली घटना:

ताईंसोबत माझं पहिल्यांदा बोलणं तेव्हा झालं ते म्हणजे ७ डिसेंबर २०२३,  मी खूप ठिकाणी CV पाठवूनही जॉबसाठी ऑफर मिळत नव्हती. खूप मेहनतीनंतर मला पहिल्यांदा एका इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. त्यावेळी मी टेलिग्राम ग्रुपवरून ताईंशी संपर्क केला आणि माझी संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली.

ताईंनी माझं सगळं नीट ऐकून घेतलं आणि मला रेकीसह काही उपाय करायला सांगितले. इंटरव्ह्यू सारखा पुढे ढकलला जात होता, तरीही दीदींनी मला धीर देत रहायच्या. त्याचदरम्यान, दीदींनी दररोज रेकी आणि हीलिंग सुरू ठेवली. अखेर, १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता माझा ऑनलाइन इंटरव्ह्यू निश्चित झाला. इंटरव्ह्यूदरम्यानही दीदी रेकी देत होत्या, त्यामुळे इंटरव्ह्यू चांगला पार पडला. HR कडून कॉल येईल असं सांगण्यात आलं होतं.

दररोज mail तपासत होतो, पण काहीच Response येत नव्हता. दीदी दररोज विचारपूस करत होत्या, पण मला नेहमीच नकारात्मक उत्तर द्यावं लागायचं. अखेर, ४ जानेवारीपर्यंत वाट पाहिली, पण mail आला नाही. मी दीदींना विचारलं की असं का होत आहे? तेव्हा दीदी म्हणाल्या, “तुझं काम व्हायलाच पाहिजेत!”

मी दीदींना पेंडुलमद्वारेही तपासायला सांगितलं. त्यावरही उत्तर सकारात्मक आलं, “हा जॉब तुला भेटायलाच पाहिजेत दाखवत आहे हा जॉब.”

८ जानेवारी २०२४ ला समजलं की माझं ऑनबोर्डिंग होल्डवर ठेवण्यात आलं आहे आणि नवीन आर्थिक वर्षात मला जॉइन करायला बोलवतील. खूप वाट पाहिल्यानंतर शेवटी मी जॉबची अपेक्षा सोडून दिली दूसरीकड़े सर्चिंग सुद्धा चालु होतच. जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिने गेले तरी सर्चिंग चालु होतच.

आणि मग, ३ मार्च २०२४ ला अचानक त्याच कंपनीतून कॉल आला. त्यांनी विचारलं, “१० दिवसांत जॉइन करू शकता का?”

मी होकार दिला, HR राउंड पार पडला आणि ७ मार्च २०२४ हा माझ्या ऑफिसमधला पहिला दिवस ठरला.

त्याद्वारे, मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात केली—स्वतःच्या पायावर उभं राहण्याची!

दीदी अधूनमधून विचारपूस करत होत्या की जॉब कसा चालला आहे. माझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यात वंदना दीदींचा पण वाटा आहे.

दुसरी घटना:

१५ डिसेंबर २०२४ ला मी सहज व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं. त्यावर दीदींचा मेसेज आला—“कसा आहेस? जॉब कसा चाललाय?” थोडक्यात बोलणं झालं.

आई आणि लहान बहीण गावी जाणार होत्या (२२ डिसेंबर), मी दोन दिवसांनी (२४ डिसेंबर) गावी गेलो.

२६ डिसेंबरला माझ्या लहान बहिणीला (वय २८, अविवाहित) अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, अशक्तपणा आला, आणि चक्कर आली. घरी डॉक्टर बोलावले, त्यांनी सलाईन लावली, पण काही फरक पडला नाही. मग ६ किमी दूर असलेल्या गावात एका हॉस्पिटलमध्ये नेलं. (दुपारी १ च्या दरम्यान) 

तेथे डॉक्टर म्हणाले, “हिला हृदयाला रक्ताची गुठळी (Blood Clot) आहे, तुम्ही तातडीने तालुक्याच्या रुग्णालयात कार्डियोलॉजिस्टकडे घेऊन जा.”

तालुक्याच्या रुग्णालयात टेस्ट झाल्यानंतर त्यांनी थेट कोल्हापूरला जायला सांगितलं ( दुपारी ३:३० – ०४:०० वाजता) आणि स्पष्ट केलं की ऑक्सिजनशिवाय घेऊँन ज़ान अत्यंत धोकादायक आहे.

त्या वेळी तिचा SpO₂ (ऑक्सिजन लेव्हल) फक्त ४०-५२ होता. कसंबसं ऑक्सिजन सिलिंडर गाडीत टाकून, रात्री ९ वाजता तिला कोल्हापुरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.

तिथे पुन्हा टेस्ट झाल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की हृदयाला रक्ताची गुठळी (Blood Clot) आहे  आणि तो ब्लड क्लॉट ब्रेक झाला आहे आणि तो फुफ्फुसांमध्ये अडकला आहे. ८०% फुफ्फुसे ब्लॉक आहेत, आणि केवळ २०% भाग कार्यरत असल्याने ती जिवंत आहे.

“तुम्ही लगेच निर्णय घ्या—ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल, आणि ती शक्य तितक्या लवकर.”

हे ऐकून पायाखालची जमीन सरकली.

मला वडील नाहीत, घराची संपूर्ण जबाबदारी आई आणि बहिणी पाहतात.

आई पूर्णतः खचून गेली आणि रडू लागली.

मीही खूप रडत होतो.

माझ्या डोळ्यासमोर माझी बहीण निघून जात असल्याचं चित्र उभं राहिलं होतं.

रात्री १०:४५ वाजता वंदना दीदींना कॉल केला.

रडण्यामुळे तोंडातून शब्दच फुटत नव्हते, खुप च रड़त होतो.

दीदी घाबरल्या, दीदींना सर्व सांगीतल त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं 

“घाबरू नकोस, आपण तिला या संकटातून बाहेर काढू!”

दीदींनी लगेच त्याच वेळी हिलिंग सुरू केली.

Psychic Surgery केली.

त्यांच्याकड़े आहेत त्या सर्व हीलिंग मेथड्स वापरल्या.

आतापर्यंत कोणालाही न दिलेलं स्पेशल प्रोटेक्शन कवच मला आणि माझ्या बहिणीला दिलं आणि संगीतल की यातून ती बाहेर पड़ूच शकनार नाही आणि काहीच धोका होणार नाही .

मी सतत दीदींना अपडेट देत होतो, दीदी स्वतः कॉल करूंन विचारायच्या.

ऑपरेशन यशस्वी झालं.

दीदी जसं सांगत होत्या, तसंच घडत गेलं!

फक्त डिस्चार्ज एक दिवस उशिरा मिळाला, पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक वाक्य तंतोतंत तसच होत गेल, जस दीदी म्हणाल्या होत्या.

टाके काढण्याच्या आधीही दीदींनी पुन्हा हिलिंग आणि Psychic Surgery केली.

आता माझी बहीण सुखरूप घरी आली आहे.

डॉक्टरांनी ३ महिने काळजी घेण्यास सांगितले आहे.

पण मी मनापासून सांगतो—

वंदना दीदींनी मला खूप धीर दिला!

कधीच भेटलो नव्हतो, फक्त कॉलवर बोलणं आणि रेकी क्लासच्या फॉलो-अप session मध्ये पाहिलं होतं—हीच आमची ओळख!

पण सख्ख्या भावापेक्षाही जास्त काळजी घेतली आणि धीर दिला !

आता मी ठामपणे सांगतो—माझ्या आता ३ बहिणी आहेत.

बहींण घरी आल्यानंतर मी वंदना दीदींना वीडियो कॉल वर बहिणीसोबत बोलायला दिल तेव्हा वंदना दीदींना पण रडू आवारल नाही, आणि वंदना दीदींनी आम्हा दोघाना आशीर्वाद दिला. 

Thank You, Vandana Didi! ðŸ˜‡

हे मी कधीही विसरू शकत नाही—

मी जॉब मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला, तो मिळाला…

आणि माझी लहान बहीणही वाचली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *